साठे खत आणि खरेदी खत : फरक.- लक्षात ठेवण्यासारखे ऍड. रोहित एरंडे
साठे खत आणि खरेदी खत : फरक लक्षात ठेवण्यासारखे . ऍड. रोहित एरंडे © आपल्याकडे एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा कुठल्याही २ किंवा अधिक व्यक्तींच्या हयातीमध्ये खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच तबदील केला जाऊ शकतो. हे दस्त कायद्याने नोंदविणे गरजेचे आहे आणि त्यावर योग्य ते मुद्रांक शुल्क म्हणजेच स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क भरणे गरजेचे असते. त्याच बरोबर अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी की ७/१२ उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड ह्या सारख्या रेव्हेन्यू रेकॉर्डने जागेमध्ये कोणाला मालकी हक्क मिळत नाही किंवा कोणाचाही मालकी हक्क हिरावून घेत नाहीत, तर हे उतारे केवळ महसूल नोंदणी करणारे दस्तऐवज आहेत. ह्यामधील खरेदीखताबरोबरच ( सेल- डीड ) अजून एका दस्ताबद्दल आपण बऱ्याच वेळा ऐकले असेल आणि तो दस्त म्हणजे "साठे खत ". साठे खताला 'साठे खत' का म्हणतात ह्या बद्दल काही माहिती आढळून आली नाही. साठे खताला इंग्रजी मध्ये "ऍग्रिमेंट फॉर सेल" अस...