डॉक्टरांना "रेफरल फी' देणे अवैध - इन्कम टॅक्स विभागाचा दणका. ॲड. रोहित एरंडे ©
डॉक्टरांना "रेफरल फी' देणे अवैध - इन्कम टॅक्स विभागाचा दणका ॲड. रोहित एरंडे © रेफरल फी, ज्यालाच काही जण कट प्रॅक्टिस असेही म्हणतात, तो विषय कायद्याच्या ऐरणीवर नुकताच आला. डॉक्टर आणि नर्सिंग होम्स ह्यांना 'रेफरल फी' नावाखाली दिलेली तब्ब्ल १ कोटी रुपयांची रक्कम हि पुणे येथील एका डायग्नोस्टिक सेन्टरला उत्पन्नातून वैध वजावट म्हणून क्लेम करता येणार नाही असा महत्वपूर्ण निकाल नुकताच पुणे येथील इन्कम टॅक्स अपिलीय ट्रॅब्युनल ने नुकताच दिला. ह्या केसची थोडक्यात हकीकत अशी कि कंपनी कायद्याखाली नोंदलेल्या पुणे येथील ह्या कंपनीचा व्यवसाय एक्स-रे, सिटी.स्कॅन अश्या वैद्यकीय निदान ( डायग्नोस्टिक) सेवा देणारा आहे. सदरील कंपनीने २०१५- १६ सालासाठी विवरणपत्र भरताना रु. १,९७,९०,४४१/- इतक्या रुपयांचा तोटा दाखविला होता. मात्र मूल्यांकन अधिकाऱ्याने रु.९७,४४,७५१/- एवढ्या रकमेची वजावट देण्यास नकार देताना असे नमूद केले कि हा खर्च संबंधित कंपनीने डॉक्टर आणि नर्सिंग होम ह्यांना दिलेल्या रेफरल फी पोटी दाखविला होता आणि रेफरल फी देणे हे वैद्यकीय परिषदेच्या तरत...