Posts

Showing posts from January 4, 2020

चित्रपटगृह आणि राष्ट्रगीताचे वाद : ह्यावेळी निमित्त ठरली एक महिला. ऍड. रोहित एरंडे. ©

चित्रपटगृह आणि राष्ट्रगीताचे वाद  : ह्यावेळी निमित्त ठरली एक महिला. ऍड. रोहित एरंडे. © राष्ट्रगीत म्हणायचे की नाही, ते चालू झाल्यावर उभे राहायचे का नाही , असे  वाद बहुतेक आपल्याच देशात उद्भवू शकतात  आणि दरवेळी  कुठलेतरी वेगळेच निमित्त पुरते हे काही दिवसांपुर्वी बेंगलुरू येथील घटनेनंतर दिसून येईल. तेथील  पीव्हीआर माँल मधील ओरिअन सिनेमागृहामध्ये  राष्ट्रगीत सुरू झाल्यावर एक तरुण महिला उठून उभी राहिली नाही म्हणून तेथे उपस्थित असलेले कन्नड टी .व्ही. कलाकार, बी.व्ही. ऐश्वर्या आणि अरुण गौडा ह्यांनी  जोरदार आक्षेप घेतला.अन्य मिडीयावर याची फारशी दाखल घेतली गेली नसली तरी    लगेचच सध्याच्या युगातले दुधारी अस्त्र म्हणून ज्यास  संबोधता येईल अश्या सोशल मीडियावर ह्याच्यावर जोरदार चर्चा सुरु झाली.  एकंदरीतच  वैयत्तिक स्वातंत्र्य, समाजभान, सार्वजनिक शिस्त ह्याबाबतीत आपल्याकडे सोशल मिडीयावर टोकदार  भूमिका मांडल्या जातात, तसेच  येथे झाले. आपण राष्ट्रगीत चालू झाल्यावर उभे का नाही राहिलो ह्याचे स्पष्टीकरण देताना  'मेन्स्ट्रूअल क्रॅम्प्स menstrual  cramps' मुळे मला राष्ट्रगीताला उभे राह