Posts

Showing posts from January 25, 2019

'हेल्मेट-सक्ती' आणि कायदा. " - ऍड. रोहित एरंडे. ©

हेल्मेट  सक्ती आणि कायदा ऍड. रोहित एरंडे. © गुजराथ मध्ये हेल्मेट "ऐच्छिक"   केल्यामुळे त्याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटणे स्वाभाविक आहे.   काही दिवसांपूर्वी हेल्मेट सक्ती मुळे पुणे शहरातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. सक्तीच्या बाजूने आणि विरुद्ध पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल  होत होत्या .  मात्र  हेल्मेट  सक्ती चांगली की नाही ह्या वादात न पडता हेल्मेट बद्दलच्या कायदेशीर तरतुदी  काय आहेत हे थोडक्यात जाणून घेण्या साप्ताहिक सकाळच्या नम्र विनंतीला मान देऊन हा लेखन प्रपंच. मोटर वाहन कायदा सर्व प्रथम ब्रिटिशांनी १९३९ साली अस्तित्वात आणला. त्यामध्ये  हेल्मेट सक्तीची तरतुद सर्वप्रथम १९७७ साली करण्यात आली. तद्नंतर १९८८ साली आधीचा कायदा रद्द होऊन सध्याचा (किचकट)  कायदा अस्तित्वात आला. ह्या कायद्याच्या कलम १२८ आणि १२९ अन्वये हेल्मेट संबधी तरतुदी केल्या आहेत  महत्वाचे म्हणजे कायद्यामध्ये हेल्मेट हा शब्द न वापरता "प्रोटेक्टिव्ह हेड गिअर" असा शब्द सगळीकडे  वापरला आहे.  कोणत्याही दुचाकी वरून जास्तीत जास्त २ व्यक्तीच जाऊ शकतात आणि दुचाकी वापरताना सर्व स