"सर्वसाधारण सभेने बहुमताने घेतलेला पुनर्विकासाचा निर्णय बंधनकारक" - ऍड. रोहित एरंडे ©
"सर्वसाधारण सभेने बहुमताने घेतलेला पुनर्विकासाचा निर्णय बंधनकारक" ऍड. रोहित एरंडे © आमची सोसायटी सुमारे २५-३० वर्षांपूर्वी बांधलेली आहे. मात्र बांधकामाची गुणवत्ता विशेष नसल्याने आणि पार्किंग इ. समस्या निर्माण झाल्याने बहुमताने आणि नियमाप्रमाणे आम्ही पुनर्विकास प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र आमच्या सोसायटीमध्येच पण मुख्य बिल्डिंग शेजारी असा एका सभासदाचा फ्लॅटवजा बंगला आहे. सोसायटीचा कन्व्हेयन्स देखील झाला आहे. आता ती व्यक्ती बंगलेवाला म्हणून पुनर्विकासाला विरोध करीत आहे आणि आजूबाजूची जागाही त्याचीच आहे असे सांगत आहे. त्या सभासदाला इतरांप्रमाणेच जुन्या प्लॅनवरील क्षेत्रफळाच्या प्रमाणात नवीन जागा इ. मिळणार आहे. मात्र कितीही समजावले तरी या व्यक्तीच्या हेकेखोरपणामुळे पुनर्विकास प्रक्रिया पुढे सरकत नाही. आमच्या आयुष्यात तरी हा प्रश्न सुटावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे या बद्दल काय करता येईल ? एक वाचक, पुणे. सर्व प्रथम पुनर्विकास (रिडेव्हलपमेंट) आणि ...