Posts

Showing posts from April 9, 2021

बँक लॉकर संदर्भात महत्वपूर्ण 'सर्वोच्च' नियमावली: ऍड. रोहित एरंडे ©

बँक लॉकर संदर्भात महत्वपूर्ण 'सर्वोच्च' नियमावली: ऍड. रोहित एरंडे © लॉकर फी. इ. सर्व भरून देखील बँकेने कुठल्याही सबळ कारणाशिवाय आणि कुठलीही पूर्वसूचना न देता याचिकाकर्त्याचा   बँक  लॉकर फोडल्यामुळे मा. सर्वोच्च न्यायालयाने बँकेला ५ लाख रुपयांचा दंड अधिक १ लाख रुपये कोर्टाच्या खर्चापोटी देण्याचा आदेश दिला  आणि हा दंड तत्कालीन बँक ऑफिसर जर ते नोकरीत असतील तर त्यांच्या पगारामधून  नाहीतर बँकेने भरावा असा महत्वपूर्ण निकाल मा. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच एका निकालात देताना बँक लॉकर संदर्भात महत्वाची नियमावली देखील घालून दिली आहे. (संदर्भ :  अमिताभ दासगुप्ता विरुद्ध युनाइटेड बँक ऑफ इंडिया , सिविल अपील क्र. ३९६६/२०१०) मा. सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले कि, आपली किंमती मिळकत सुरक्षित राहावी म्हणून अतिशय विश्वासाने ग्राहक लॉकर फॅसिलिटी घेतात आणि त्याचे चार्जेस देखील भरतात, परंतु ग्राहक   हा पूर्णपणे बँकेच्या अखत्यारीत असतो आणि अश्यावेळी बँकेने लॉकर वापराबद्दल आमची काहीही जबाबदारी नाही असा पवित्रा घेणे पूर्णपणे चुकीचे  आहे. मा. न्यायालयाने पुढे नमूद केले कि आमच्या लक्षात आले आहे कि बँक