जात आणि धर्म : कधी बदलता येतात का ? लग्नानंतर महिलेची जात बदलते का ? एखाद्या व्यक्तीला कोणताच धर्म नाही असे कायदेशीर रित्या म्हणता येते का ? ऍड. रोहित एरंडे ©
धर्म बदलला तरी जात बदलत नाही.. ऍड. रोहित एरंडे © जात आणि धर्म ह्यांचे उच्चाटन व्हावे, त्यायोगे कोणावर अन्याय होऊ नये असे सगळे म्हणत असले तरी ह्या दोन शब्दांभोवती देशाचे राजकारण फिरत असते आणि न्यायालयीन निकाल देखील वेगळेच आहेत. एखाद्या व्यक्तीने धर्मांतर केले तरी त्याची जात देखील बदलते असा प्रश्न नुकताच मा. चेन्नई उच्च न्यायालयापुढे उपस्थित झाला. इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेल्या याचिकाकर्ता एस. पॉल राज, ह्या जन्माने आदी-द्रविडर ह्या अनुसुचित जाती मधील व्यक्तीने अमृता नामक हिंदू अनुसूचित जातीच्या महिलेशी लग्न केले. लग्नानंतर पॉल राज ह्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि त्यामुळे तामिळनाडूमधील प्रचलित कायद्याप्रमाणे त्याला "मागासवर्गीय" असे जात प्रमाणपत्र मिळाले आणि त्यामुळे त्याने "आंतरजातीय विवाह" झाल्याचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून सरकार दरबारी अर्ज केला, जेणेकरून त्याला सरकारी नोकरीमध्ये त्याचा फायदा होणार होता. मात्र त्याचा हा अर्ज फेटाळला गेल्यामुळे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचते. सर्व बाजूंचा आणि पूर्वीच्या निकालांचा विचार करून मा. न्या. सुब्रमण्यम ह्यांनी १७ न...