Posts

Showing posts from November 9, 2020

७/१२ उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड ह्यांना मालकी हक्काचा पुरावा का म्हणत नाहीत ?प्रॉपर्टी मधील मालकी हक्क कसा मिळू शकतो ?. ऍड. रोहित एरंडे ©

 प्रॉपर्टी मधील   मालकी हक्क कसा मिळू शकतो ? ७/१२ उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड ह्यांना मालकी हक्काचा पुरावा का म्हणत नाहीत ? ऍड. रोहित एरंडे .© "आता प्रत्येक फ्लॅटची स्वतंत्र नोंद प्रॉपर्टी कार्ड वर होईल आणि प्रत्येकाला मालकी हक्काचा पुरावा होईल" , " कन्व्हेयन्स डीड न करताच आपण मालक होणार " अश्या आशयाच्या बातम्या वाचण्यात आल्या आणि परत एकदा आपल्याकडे कायद्याचे अज्ञान किती आहे आणि व्हॉटसअप विद्यापीठातून काहीही पसरु शकते ह्याची प्रचिती आली. "मला माझ्या मुलाच्या 'नावावर' जागा करायची आहे" , "माझ्या बरोबर माझ्या बायकोचेही 'नाव' प्रॉपर्टीवर लावायचे आहे",   यांसारखे प्रश्न अनेकवेळा वकीली व्यवसायात आम्हाला विचारले जातात. "नावावर जागा करणे" किंवा "७/१२ वा  प्रॉपर्टी कार्डला नाव लावणे" या बाबतीत  लोकांमध्ये अनेक गैरसमज दिसून येतात. बहुसंख्य लोकांना असे वाटत असते की, ७/१२ च्या उताऱ्याला किंवा   प्रॉपर्टी कार्डला नाव लावायचा अर्ज दिला कि झाले. बऱ्याच लोकांचा असा समज असतो की तहसीलदार ऑफिस मध्ये नुसता अर्ज करून मिळकतीवर आपले ना