मृत्युपत्र अंमलात येण्याआधी ते करणाऱ्याला बदलता येते. ॲड. रोहित एरंडे.©
माझ्या सासूबाईंनी चार वर्षांपूर्वी एका नोंदणीकृत मृत्यूपत्रामध्ये त्यांचा स्वतःच्या मालकीचा एक फ्लॅट मला आणि माझ्या पत्नीला दिला होता. त्यांनी मला ते मृत्युपत्र स्वतः दाखविले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले , त्यावेळी आम्ही मृत्यूपत्राचा विषय काढल्यावर , माझ्या पत्नीच्या धाकट्या बहिणीने आणि तिच्या पतीने, त्यांच्या दोघांच्या नावे याच फ्लॅटचे सुमारे एक वर्षांपूर्वी सासूबाईंनीच केलेले नोंदणीकृत बक्षीसपत्र आम्हाला दाखवले आणि फ्लॅटवर त्यांचा हक्क सांगितला . एकतर आमच्या नावाने मृत्यूपत्र केलेले असताना त्यानंतर सासूबाई असे बक्षिसपत्र करू शकतात का ?, त्या विरुध्द कोर्टात जाता येईल का ? एक वाचक, मुबंई मृत्युपत्र हा खूप महत्वाचा विषय आहे, पण त्याच्याबद्दल चे अज्ञान आणि भिती हे मृत्यूपेक्षाही जास्त आहे हे वेळोवेळी दिसून येते. त्याबद्दल कितीही वेळा लिहिले तरीही प्रश्न संपत नाहीत. आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मृत्यूपत्र आणि बक्षीसपत्र ह्यांच्या कायदेशीर तरतुदींची परत एकदा थोडक्यात माहिती देतो. आपल्या स्वकष्टार्जित मिळकतीचे काय करायचे, ती कोणाला द्यायची हा ज्याचा त्या...