सोसायटी आणि पार्कींगच्या समस्या. ऍड. रोहित एरंडे . ©
सोसायटी आणि पार्कींगच्या समस्या. ऍड. रोहित एरंडे. © " आमच्या सोसायटी मध्ये आम्ही 'अतिथी देवो भव' ही संस्कृती जपतो... परंतु आमचेकडे पार्किंग समस्या असल्याने, देवांनी त्यांची पुष्पक विमाने सोसायटी बाहेर लावावीत" असा विनोद व्हॉट्सॲप वर मध्यंतरी वाचला आणि विनोदाचा भाग सोडला तरी पार्किंग समस्या हा सोसायटीमध्ये जिव्हाळ्याचा विषय असतो. बिल्डर फ्लॅट बरोबर पार्किंग देखील विकू शकतो की नाही आणि सोसायटीची स्थापना झाल्यावर पार्किंग बद्दलचे नियम ह्या बद्दलची थोडक्यात कायदेशीर माहिती आपण बघूया. पार्किंगचे २ प्रकार साधारणपणे कायद्याने ओळखले जातात. १. सामाईक (कॉमन /ओपन)पार्किंग आणि स्टील्ट पार्किंग आणि २. कव्हर्ड / गॅरेज पार्किंग महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स ऍक्ट (मोफा) १९६३ हा आद्य कायदा आणि नुकताच पारित झालेला रेरा कायदा यांच्यामध्ये बिल्डर-प्रमोटर ह्यांची कर्तव्ये , जबाबदाऱ्या आणि फ्लॅट ग्राहकांचे हक्क-अधिकार आणि ह्यांचा उहापोह केलेला आढळून येतो. सरकारने संमत केलेली विकास नियंत्रण नियमावलीप...