खासगी हॉस्पिटल्स आणि उपचार : इकडे आड तिकडे विहीर. ऍड. रोहित एरंडे ©
खासगी हॉस्पिटल्स आणि उपचार : इकडे आड तिकडे विहीर. नाण्याच्या दोन्ही बाजू समजून घेताना.. ऍड. रोहित एरंडे © कोरोना आणि उपचार ह्या गोष्टींबरोबरच लाखोंच्या संख्येने स्थलांतर करणाऱ्या मजुरांचा प्रश्न देखील सर्व देशभरात उपस्थित झाला. ह्या प्रश्नासाठी मा. सर्वोच्च न्यायालायने तसेच देश भरातील विविध उच्च न्यायालयांनी स्वतः जनहीत याचिका दाखल करून घेऊन वेळोवेळी संबंधित राज्य सरकारांना सूचना केल्या आहेत. मा. गुजराथ उच्च न्यायालायने देखील अशीच याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेमध्ये उच्च न्यायालायने स्पष्ट शब्दांत हे नमूद केले कि "पोटाची भूक हे फार वाईट असते, अश्या परिस्थितीमध्ये जेथे मजुरांना खायला अन्न -पाणी नाही, त्यांना सोशल- डिस्टंसिंग म्हणजे काय हे शिकविण्याचा हा काळ नाही, त्यांना २ वेळचे अन्न -पाणी आणि निवारा नीट मिळते का नाही हे बघणे राज्य सरकारचे प्रथम कर्तव्य आहे. कोरोनावर मात करून पेशंट वाचला, पण दुसरीकडे अन्नावाचून मजूर मरण पावला हे खूप दुःखदायक आहे आणि हे घडणे अपेक्षित नाही. कोरोना उपचार खर्चाचे त्रांगडे : हॉस्पिटल आणि बिलाचे पैसे जास्त का...