Posts

Showing posts from December 3, 2023

कन्व्हेयन्स करणे म्हणजे काय ? - ऍड. रोहित एरंडे ©

 कन्व्हेयन्स करणे म्हणजे काय ? ऍड. रोहित एरंडे  © मंत्रीमंडळाने कन्व्हेयन्स डीड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता आपणच आपल्या मिळकतीचे मालक होणार आणि तशी नोंद प्रॉपर्टी कार्डवर होणार, अश्या आशयाचा  मेसेज बरेच दिवस व्हाट्सऍपवर फिरत आहे आणि लोकांचाही त्यावर चटकन विश्वास बसतो. व्हाट्सऍपवर युनिव्हर्सिटीवर येणाऱ्या, विशेषकरून कायदा आणि वैद्यकीय विषयाच्या मेसेजेसवरती अंधपणे का विश्वास ठेवू नये ह्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.        एकतर कुठलाही कायदा बदलण्याची  विहित प्रक्रिया  असते आणि मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कायदे  केले जात नाहीत आणि प्रॉपर्टी कार्ड किंवा ७/१२ ह्यांनी मालकी ठरत नाही,  त्यामुळे सदरचा मेसेज एक  अफवा आहे.  कन्व्हेयन्स म्हणजे काय ? कन्व्हेयन्सचा अर्थ एखाद्या जागेमधील मालकी हक्क दुसऱ्याच्या नावे तबदील करणे, थोडक्यात खरेदी खत असे म्हणता येईल. भारतामध्ये 'ड्युअल ओनरशिप' हि पद्धत असल्यामुळे  जमिनीचा मालकी हक्क एकाकडे आणि त्यावरील इमारतीची मालकी दुसऱ्याकडे असू असते, आपल्याकडे सहसा अशी पद्धत असते, कि जमीन मालक बिल्डर बरोबर डेव्हलपमेंट ऍग्रिमेंट करतो ज्यायोगे बिल्डर बिल्डिं