Posts

Showing posts from September 21, 2022

सोसायटीमध्ये ट्रान्सफर-फी किती घेता येते आणि कधी माफ होऊ शकते ? ऍड. रोहित एरंडे. ©

सोसायटीमध्ये  ट्रान्सफर-फी किती घेता येते आणि कधी माफ होऊ शकते ? प्रश्न : सर, आम्ही एका सोसायटीमध्ये राहतो. तिथला फ्लॅट आम्हाला विकायचा आहे. परंतु सोसायटीवाले एक लाख रुपये एवढी फी ट्रान्स्फर फी  फी म्हणून मागत आहेत आणि प्रत्येक सोसायटीचा कायदा वेगळा असतो असे सांगत आहेत, तर सोसायटी एवढी रक्कम ट्रान्स्फरफी पोटी मागू शकते का, ह्या बाबत कृपया मार्गदर्शन करावे. एक त्रस्त सभासद., उत्तर: ह्या संबंधीतला कायदा आता पक्का झाला असून देखील आजही अशी मनमानी होत असेल तर ते चुकीचे आहे. सोसायटीमधील सदनिका विकताना सभासदत्व हस्तांतरण फी म्हणजेच ट्रान्सफर फी पोटी भरमसाट रकमा आकारल्या जाण्यावरून अनेक तक्रारी आल्यामुळे महाराष्ट्र शासनाने दि. ०९/०८/२००१ रोजी काढलेल्या अध्यादेशाप्रमाणे जास्तीत जास्त रु. २५,०००/- सभासदत्व ट्रान्सफर फी आकारता येईल असे स्पष्ट केले, जे आज रोजी देखील लागू आहे आणि ह्यावर मा. मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट निकाल आहेत.  जे प्रत्यक्षपणे करता येत नाही ते अप्रत्यक्षपणेहि करता येणार नाही,  ह्या कायदेशीर तत्वाप्रमाणे ह्याप्रमाणे "डोनेशनच्या नावाखाली अवाच्या सवा ट्रान्सफर फी आकारता येणा