अब (तक) ३५६ ? -राष्ट्रपती राजवट ? ऍड. रोहित एरंडे. पुणे ©
अब (तक) ३५६ ? -राष्ट्रपती राजवट ? ऍड. रोहित एरंडे. पुणे © सुमारे अडीच वर्षांपूर्वी देखील महाराष्ट्रामधील एकंदरीतच सर्व परिस्थिती ही रामदास स्वामींनी म्हणून ठेवल्याप्रमाणे "मतामतांचा गलबला। कोणी पुसेना कोणाला।" अशी होती. निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेले बहुमत सिद्ध करण्यात सुरुवातीला कोणत्याच पक्षाला यश न आल्यामुळे अखेर महाराष्ट्रामध्ये 'राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. नंतर महाविकास आघाडी सरकार अस्तितीवर आले. मात्र आज परत तशीच परिस्थिती उद्भवली आहे आणि सरकार टिकणार का नवीन साकारकर येणार का घटनेतील अनुच्छेद ३५६ प्रमाणे राष्ट्रपती राजवट लागू होणार ह्याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत आणि परत एकदा राजकारणाचा रंग हा काळा किंवा पांढरा नसून करडा (ग्रे)असतो हे परत एकदा सिद्ध झाले. राष्ट्रपती राजवटी संदर्भातील राज्यघटनेमधील अनुच्छेद ३५६ ही तरतूद सुरुवातीपासूनच विवादास्पद राहिली आहे त्याची थोडक्यात माहिती आपण घेवू. ब्रिटिशांच्या काळात देखील गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट , १९३५ च्या कलम ९३ अन्वये तत्कालीन गव...