Posts

Showing posts from September 2, 2021

बँक लॉकर उघडला आणि... आणि.. ऍड. रोहित एरंडे ©

  बँक लॉकर उघडला आणि.. ऍड. रोहित एरंडे © २०० व्या ब्लॉगच्या निमित्ताने...  रुक्ष वाटणाऱ्या, किचकट कायद्यांचा अभ्यास कराव्या लागणाऱ्या   वकीली  व्यवसायातही  कधी कधी हसवणुकीचे / मजेशीर  प्रसंग येतात बर का.  एखाद्य जागेची पाहणी करण्या करता, एखादा साक्षीदार आजारपणामुळे कोर्टात साक्ष घ्यायला येऊ शकत नसेल, तर त्याची साक्ष नोंदवायला "कोर्ट कमिशनर" ची नेमणूक केली जाते. थोडक्यात  एखाद्या वकीलाची नेमणूक कोर्ट अशी कामे करण्यासाठी करते आणि बहुतेकवेळा ज्युनिअर वकीलांना असे काम दिले जाते. जेणेकरून त्यांना अनुभवही मिळतो आणि कामाचे थोडे पैसेही मिळतात.  अशीच  वकिलीची उमेदवारी करताना मला एका कामामध्ये कोर्ट कमिशनर म्हणून नेमण्यात आले. विषय होता वारसा हक्क प्रमाणपत्र (सक्सेशन सर्टिफिकेट ) मिळण्याचा.  आपल्या कैलासवासी  वडिलांच्या  बँक लॉकरमध्ये काय काय ठेवले आहे  हे बघण्यासाठी त्यांची चारही मुले उत्सुक होती, परंतु लॉकर एकट्या वडिलांच्या नावाने असल्यामुळे चावी असून देखील लॉकर उघडता येत नव्हता आणि बँकेने देखील वारसा हक्क प्रमाणपत्र आणण्यास सांगतिले होते. त्यामुळे  कोर्टाने माझी  "कोर्ट कमिशनर