हेअरशिप सर्टिफिकिट : थोडक्यात पण महत्वाचे. ऍड. रोहित एरंडे.©
#हेअरशिप #सर्टिफिकिट : थोडक्यात पण महत्वाचे. ऍड. रोहित एरंडे.© मागील लेखात आपण वारसा हक्क प्रमाणपत्र जंगम मिळकतींसाठी (movable ) लागणाऱ्या सक्सेशन सर्टिफिकिट बद्दल ,माहिती घेतली. या लेखाद्वारे आता स्थावर मिळकतींबाबत लागणारे हेअरशिप सर्टिफिकिट बद्दल थोडक्यात माहिती घेऊ. बॉम्बे रेग्युलेशन कायदा १८२७ च्या तरतुदींप्रमाणे हेअरशिप सर्टिफिकेट मिळविण्यासाठी मयत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांना, कायदेशीर प्रशासकाला अर्ज करता येतो. त्या अर्जात मयत व्यक्तीचा मृत्यू दिनांक, मृत्यूसमयीचा राहण्याचा पत्ता, सर्व वारसांची नावे आणि पत्ते आणि मयत व्यक्तीच्या मिळकतीचे वर्णन इ. गोष्टींचा उल्लेख अपेक्षित असते. हा अर्ज सक्षम जिल्हा न्यायालयात किंवा निर्देशित न्यायालयात करता येतो. पुण्यासारख्या ठिकाणी हा अधिकार दिवाणी न्यायालयांना दिलेला आहे. . अर्ज केल्यावर कोर्ट इतर वारसांना नोटीसा काढते, तसेच 'सायटेशन/प्रोक्लमेशन ' नामक नोटीस देखील कोर्टाकडून प्रसिद्ध केली जाते आणि कोर्टाच्या आवारात किंवा मृत व्यक्तीच्या पत्त्याच्या जागी ती चिटकवली जाते. तसेच वर...