Posts

Showing posts from August 2, 2017

"ग्राहक न्यायालयाचे दरवाजे "ट्रस्ट" ला बंद..

" ग्राहक न्यायालयाचे दरवाजे "ट्रस्ट" ला बंद..  एखादी "ट्रस्ट" ज्याला मराठी मध्ये "न्यास" असे म्हणतात अशी संस्था ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत "तक्रारदार " म्हणून तक्रार दाखल करू शकते का ? असा प्रशा मा. सर्वोच्च न्यायालयापुढे नुकताच उपस्थित झाला. प्रतिभा प्रतिष्ठान विरुद्ध मॅनेजर, कॅनरा बँक या याचिकेवर निकाल देताना मा. न्या. मदन बी. लोकूर आणि पी. सी. पंत ह्यांच्या खंडपीठाने वरील प्रश्नाचे उत्तर नकारार्थी देताना असे नमूद केले कि सदरील कायद्यांतर्गत "तक्रारदार" ह्या व्याख्येमध्ये "ट्रस्ट" चा समावेश होऊ शकत नाही आणि सबब "ट्रस्ट" ला ग्राहक संरक्षण कायद्याचे "संरक्षण" मिळू शकत नाही.  प्रतिभा प्रतिष्ठान ट्रस्ट ह्या बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट अन्वये नोंदणी झालेल्या संस्थेने अलाहाबाद बँक आणि कॅनरा बँक यांच्याविरुद्ध ट्रस्टच्या सुमारे १२ कोटी रुपयांच्या ठेवींसंदर्भात अफरातफर केल्याचा आरोप करून राष्ट्रीय ग्राहक मंचापुढे "सेवेत हलगर्जी" केली म्हणून दाद मागितली होती. (तक्रार क्र. १५५ आणि १५६ /१९९७).