Posts

Showing posts from October 6, 2023

न विकलेल्या फ्लॅटचा मेंटेनन्स देण्यास बिल्डर बांधील. -नुसते रजिस्ट्रेशन होऊन सोसायटी मालक होत नाही. - ऍड. रोहित एरंडे ©

न विकलेल्या फ्लॅटचा मेंटेनन्स देण्याची जबाबदारी बिल्डरवर .. आमची सोसायटी नुकतीच अस्तित्वात आली आहे. सोसायटी नोंदणी फॉर्मवर बिल्डरने सह्या केल्या होत्या. पण  आमच्या सोसायटीमध्ये काही  फ्लॅट अजुनहि  विकले गेलेले नाहीत, तर अश्या न विकलेल्या फ्लॅटचा  मेन्टेनन्स बिल्डर कडून घेता येतो का ?.  एक वाचक, पुणे.  उत्तर - आपल्यासारखे प्रश्न अनेक सोसायट्यांमध्ये दिसून येतात. ह्यासाठी आपल्याला रेरा कायदा आणि मोफा कायदा दोघांच्या तरतुदी बघाव्या लागतील. रेरा कायदा आला असला तरी  मोफा कायदा पूर्णपणे  रद्द झालेला नाही हेही लक्षात घ्यावे.   मोफा कायदा कलम (१०)१ अन्वये सोसायटी /अपार्टमेंट / कंपनी स्थापनेसाठी कमीत कमी आवश्यक संख्या झाल्यावर सोसायटी किंवा अपार्टमेंट स्थापन करणे गरजेचे आहे आणि त्याचप्रमाणे जे फ्लॅट्स विकले गेलेले नाहीत (अन-सोल्ड ) अश्या न विकलेल्या  फ्लॅटचे सभासदत्व बिल्डरला घेणे क्रमप्राप्त आहे. रेरा कायदा कलम ११ (४)(e) अन्वये बहुसंख्य फ्लॅट धारकांनी बुकिंग केल्यावर ३ महिन्यांच्या आत सोसायटी किंवा अपार्टमेंट असोसिएशन किंवा कंपनी फॉर्म (रजि...