Posts

Showing posts from May 12, 2023

जागा भाड्याने दिली म्हणून जास्तीचा देखभाल खर्च आकारता येतो? - ऍड. रोहित एरंडे. ©

  जागा भाड्याने दिली म्हणून जास्तीचा देखभाल खर्च  आकारता येतो?  ऍड. रोहित एरंडे. © सर, माझी फ्लॅट मी भाड्याने दिला आहे. आता सोसायटी मला दरमहाचा देखभाल खर्च दुपटीने द्यायला सांगत आहे. तर असा काही कायदा आहे का ? नाहीतर आम्हाला जागा भाड्याने देण्यास परवडणार नाही. कृपया मार्गदर्शन करावे. एक त्रस्त फ्लॅट मालक, पुणे. खरे तर ह्या बाबतीतील कायदा पक्का होऊन २ दशके होऊन गेली आहेत आणि ह्यावर अनेक वेळा लिहिले ही गेले आहे तरी देखील काही सोसायट्या कायदा धाब्यावर बसवतात हे दुर्दैवी आहे.  कायदा सांगतो की एखाद्या जागामालक - सभासदाने तिऱ्हाईत व्यक्तीस जागा भाड्याने दिली असेल, तर त्या सभासदाकडून मासिक देखभाल खर्चाच्या जास्तीत जास्त १०% इतकीच रक्कम Non Occupancy Charges म्हणून आकारण्याचा सोसायटीला अधिकार आहे.   ( संदर्भ : महाराष्ट्र सरकारने सहकार कायद्याच्या कलम ७९-अ अन्वये दिनांक  ०१/०८/२००१  रोजी काढलेला  अध्यादेश)  ' हा अध्यादेश घटनात्मक दृष्ट्या वैध असल्याचा आणि सभासदाने त्याचे घर भाड्याने दिल्यास सोसायटीचे काहीच नुकसान होत नाही आणि स्वतःचे घर भाड्याने देऊन उत्पन्न घेण्याचा अधिकार घरमालकाला