Posts

Showing posts from August 7, 2017

"दोघांनी, परस्पर संमतीने शरीरसंबंध ठेवल्याचे मान्य केल्यामुळे बलात्काराचा गुन्हा रद्द, परंतु कोर्ट-पोलीस ह्यांचा वेळ घालवल्याबद्दल ५० हजार रुपयांचा दंड"

"दोघांनी, परस्पर संमतीने शरीरसंबंध ठेवल्याचे मान्य केल्यामुळे बलात्काराचा गुन्हा रद्द, परंतु कोर्ट-पोलीस ह्यांचा वेळ घालवल्याबद्दल ५० हजार रुपयांचा दंड" बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी आणि तक्रारदार महिला ह्यांनी आपापसातील भांडणे परस्पर संमतीने मिटविण्याचा निर्णय घेतल्यामुळॆ आणि एकमेकांविरुद्धच्या  गैरसमजातून तक्रार दाखल झाल्यामुळे सदरील गुन्हा रद्द करावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तेव्हा  मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने   (मा. न्या. सारंग कोतवाल आणि मा. न्या. रणजित मोरे ) , मोहोम्मद बबलू कासिरुद्दिन शेख विरुद्ध महाराष्ट सरकार आणि इतर, ह्या याचिकेवर १९ जुलै २०१७ रोजी  निकाल देताना (रिट पिटिशन क्र. २८२१/२०१७) सदरील गुन्हा रद्द केला, पण स्वतःची खासगी भांडणे मिटविण्यासाठी कोर्ट आणि पोलीस  यंत्रणा यांचा वापर केला या कारणासाठी आरोपीला ५०,०००/- चा दंड ठोठावला आणि सदरील दंड "टाटा मेमोरियल हॉस्पिटल" मध्ये भरण्यास सांगितला. ह्या केस ची थोडक्यात हकीकत अशी की तक्रादार महिलेने दिंडोशी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्ह