कन्व्हेयन्स डीड रद्द करण्याचा निर्णय ही अफवाच : ॲड. रोहित एरंडे ©
मंत्रीमंडळाने कन्व्हेयन्स डीड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता आपणच आपल्या मिळकतीचे मालक होणार आणि तशी नोंद प्रॉपर्टी कार्डवर होणार, अश्या आशयाचा मेसेज बरेच दिवस व्हाट्सऍपवर फिरत आहे. आमच्या मित्रांच्या ग्रुप मध्येही ह्यावर बरीच चर्चा झाली तरी कृपया ह्याबाबत मार्गदर्शन करावे. आम्ही काही वाचक , मुंबई. व्हाट्सऍपवर युनिव्हर्सिटीवर येणाऱ्या, विशेषकरून कायदा आणि वैद्यकीय विषयाच्या मेसेजेसवरती अंधपणे का विश्वास ठेवू नये ह्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. एकतर कुठलाही कायदा बदलण्याची विहित प्रक्रिया असते आणि मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कायदे केले जात नाहीत आणि प्रॉपर्टी कार्ड किंवा ७/१२ ह्यांनी मालकी ठरत नाही, त्यामुळे सदरचा मेसेज एक अफवा आहे. तुमची सोसायटी आहे का अपार्टमेंट ह्याचा बोध होत नाही कारण सोसायटी आणि आपार्टमेंट ह्या दोन्हींच्या बाबतीत कन्व्हेयन्सची संकल्पना वेगळी आहे. तुमच्या अश्या चर्चांचा इतरांना फायदा होतोय त्याबद्दल धन्यवाद. असो. कन्व्हेयन्सचा अर्थ एखाद्या जागेमधील मालकी हक्क दुसऱ्याच्या नाव...