Posts

Showing posts from April 10, 2024

लिव्हिंग विल - आयसीयू - व्हेंटीलेटरला टाळण्याचा मार्ग. ऍड. रोहित एरंडे ©

 लिव्हिंग विल (Advance directives) - आयसीयू - व्हेंटीलेटरला टाळण्याचा मार्ग.  ऍड. रोहित एरंडे  © मृत्युपत्र म्हणजेच Will  हे आपल्या मृत्युपश्चात आपल्या  मालमत्तेची व्यवस्थित विभागणी व्हावी यासाठी केले जाते. आपण  आयुष्यभर अश्या मालमत्ता मिळविण्यासाठी, ती टिकवण्यासाठी आणि तिचा उपभोग घेण्यासाठी  देह झिजवितो आणि अशी प्रत्येकाची इच्छा असते कि  शरीरात नळ्या न खुपसता , हॉस्पिटल मध्ये खितपत न पडता  अगदी सहज -सायास मरण यावे, आणि आपल्याला आणि आपल्या प्रियजनांना आपल्या आजारपणाचा  त्रास होऊ नये  अशी इच्छा प्रत्येकाची असते. मात्र आपल्या इच्छेप्रमाणे घडतेच असे नाही.  आजार असाध्य असो किंवा नसो, आपला  रुग्ण बरा होण्यासाठी जवळची लोकं  वेळ, पैसे आणि मानसिक शांतता खर्च झाली तरी जेवढे शक्य होईल तेवढे उपाय करीत असतात . मात्र अश्या असाध्य आजारासाठी व्हेंटिलेटर सारख्या जीवन समर्थन प्रणालीवर उपचार कितीवेळ चालू ठेवावेत  असा विचार संबंधितांच्या मनात  येतोच. आपल्यावर किंवा आपल्या प्रियजनांवर अशी  वेळ येऊ नये आणि त्यापेक्षा   डॉक्टरांनी  एखादे इंजक्शन डॉक्टरांनी देऊन  शांतपणे शेवटचा श्वास घेतला  असे  अनेकांना वाट