Posts

Showing posts from November 7, 2022

सार्वजनिक श्वानप्रेमाला घरचा रस्ता... ऍड. रोहित एरंडे. ©

सार्वजनिक श्वानप्रेमाला घरचा रस्ता...  ऍड. रोहित एरंडे.  © भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे चिमुरडा जखमी किंवा भटकी कुत्री मागे लागल्यामुळे दुचाकीस्वाराचा अपघात, अश्या बातम्या आपण वाचल्या असतील किंवा आपल्यापैकी अनेकांनी भटक्या कुत्र्यांची दहशत अनुभवली असेल.   ह्या विषयी अनेक वेळा विविध माध्यमांवर चर्चा झाल्याचे  आणि वादविवाद झाल्याचेहि  दिसून येते. मात्र प्रशासनाकडे तक्रार करूनही काहीही उपयोग न झाल्याने अखेर नागपूरमधील काही पिडीत लोकांनी   थेट  मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात  पिटिशन दाखल करून  भटक्या कुत्र्यांना खाऊ-पिऊ घालणे आणि अश्या कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करावा असे २ प्रश्न कोर्टापुढे नुकतेच उपस्थित केले.  (केस संदर्भ : विजय तालेवार विरुद्ध महाराष्ट्र सरकार. सिव्हिल अपील क्र. २३६४/२०२२, मा. न्या. सुनील शुक्रे आणि मा. न्या. अनिल पानसरे ) आपल्या निकालपत्रामध्ये सुरुवातीलाच नागपूरमधील भटक्या कुत्र्यांचा प्रचंड वाढल्येल्या त्रासाबद्दल कोर्टाने  चिंता व्यक्त केली असून अश्या  श्वान प्रेमींना कठोर बोल सुनावले आहेत. मूठभर लोकांच्या श्वानप्रेमापोटी  बाकीच्यांनी का त्रास सहन क