Posts

Showing posts from July 7, 2023

फ्लॅट वापरत नाही मग मेंटेनन्स आणि ना वापर शुल्क यांची होणारी गल्लत - ॲड. रोहित एरंडे.©

 सभासद जागा वापरत नसेल म्हणजेच कुलूप बंद ठेवली असेल तरीही त्याने  मेंटेनन्स देणे क्रमप्राप्त आहे, पण अश्या केस मध्ये  ना वापर शुल्क सोसायटीला घेता येणार नाही.  ऍड. रोहित एरंडे.© सर, माझा एक फ्लॅट आहे, तो मी बंद ठेवला आहे, वापरत नाही, कारण मी दुसरीकडे राहते. तो फ्लॅट मी भाड्यानेही दिलेला नाही, तरीही सोसायटी माझ्याकडून मेंटेनन्स आणि  ना वापर शुल्क मागत आहे ? तर ह्या परिस्थितीमध्ये मी ते देण्यास बांधील आहे का ? एक वाचक, पुणे.  आपल्या सारखे प्रश्न अनेक वेळा उपस्थित होतात. कारण "ना-वापर" शुल्क म्हणजेच non occupancy  charges  ह्या नावावरून लोकांची किंबहुना सोसायटी कमिटीची अशी धारणा होते, कि फ्लॅट बंद ठेवला असेल म्हणजेच मालक त्यात राहत नसला, फ्लॅट कुलूप बंद असला म्हणजेच तो वापरात नाही म्हणून "ना-वापर" शुल्क  घ्यावे, तर सभासदांची धारणा असते कि मी फ्लॅट बंद ठेवला आहे, सोसायटीच्या कुठल्याही सोयी वापरात नाही त्यामुळे मी कुठलेच पैसे देण्यास बांधील नाही. वरील दोन्ही धारणा का चुकीच्या आहेत ते आपण थोडक्यात बघू.  ना-वापर शुल्क कधी घेतात ? एखादा सभासद स्वतः जागा वापरात नसेल आणि त्या