नॉमिनेशनने "मालकी हक्क" मिळत नाही, तो एक केवळ विश्वस्त....
नॉमिनेशनने "मालकी हक्क" मिळत नाही, तो एक केवळ विश्वस्त.... ऍड. रोहित एरंडे © सध्या " व्हॉटसअप युनिव्हर्सिटी " वर नॉमिनी म्हणजेच मालक असल्याचे मेसेजेस फिरत आहेत आणि लोकांचा त्यावर चटकन विश्वास देखील बसतो. परंतु कायदा काय आहे हे जाणून घेतल्यास बरेच गैरसमज दूर होण्यास मदत होतील.. नॉमिनेशनने "मालकी हक्क" मिळत नाही हा कायदा खरेतर आता इतका पक्का झाला असताना देखील अजूनही ह्याच प्रश्नावर कोर्ट केसेस उच्च न्यायालयापर्यंत पोहोचत आहेत, हे दुर्दैवी आहे. मोहन मेघराज श्रॉफ विरुद्ध डेप्युटी रजिस्ट्रार, को .ऑप. सोसायटी मुंबई (२०१८, भाग ५, महाराष्ट्र लॉ. जर्नल पण क्र . १) ह्या निकालात मा. मुंबई उच्च न्यायालयाने प्रत एकदा ह्या प्रश्नाचा उहापोह केला आहे. नेपिअन सी रोड, मलबार हिल, मुंबई या उच्चभ्रू परिसरात असलेल्या गाईड बिल्डिंग सोसायटीमधील एका फ्लॅट बद्दलचा हा वाद असतो. सदरील फ्लॅटचे श्री. अमर श्रॉफ आणि श्री. लक्ष्मीनारायण श्रॉफ असे २ मूळ सभासद असतात आणि ते दोघेहीजण आपापल्या ५०% हिश्शयाचे नॉमिनी म्हण...