Posts

Showing posts from May 3, 2023

रिडेव्हलपमेंट उगाचच अडवून धरणाऱ्या हेकेखोर सभासदाला ५ लाख रुपयांचा दंड. - ऍड. रोहित एरंडे ©

रिडेव्हलपमेंट उगाचच अडवून धरणाऱ्या  हेकेखोर सभासदाला ५ लाख रुपयांचा दंड.  आमची १२ सभासदांची  सोसायटी ४० वर्षांपूर्वी  बांधलेली आहे. एवढ्या वर्षांनंतर आता सारख्या दुरुस्त्या इ. कराव्या लागतात आणि त्यावर खूप खर्च होतो. सबब आता रिडेव्हलपमेंट व्हावे अशी आमच्या ११ सभासदांची इच्छा होती. त्याप्रमाणे नियमाप्रमाणे पारदर्शकपणे कार्यवाही करून बिल्डर बरोबर  करारही झाला आहे.    मात्र एक सभासद, जे इथे राहत देखील नाहीत, ते मात्र रिडेव्हलपमेंटला पहिल्यापासून उगाच विरोध करीत आहेत. आम्ही सर्वानी त्यांना परोपरीने समजावून सांगितले पण काही उपयोग नाही. ह्या आडमुठे धोरणामुळे करार होऊनही ताबा न मिळाल्यामुळे बिल्डरला काम सुरु करता येत नाही आणि आमच्या सारख्या ज्येष्ठ नागरिकांना आमच्या हयातीमध्ये तरी नवीन फ्लॅटचे स्वप्न साकार होईल असे वाटत नाही. ह्या बद्दल काय करता येईल ? त्रस्त सभासद, पुणे  आपल्या  सारखे प्रश्न अनेक सोसायट्यांमध्ये दिसून येतात.  एखाद्या सोसायटीचे रिडेव्हलपमेंट पटकन होऊन जाते, नाहीतर भिजत घोंगडे पडते.  बऱ्याचदा,  जसे घटस्फोट  घेण्याचे खरे कारण शेवट्पर्यंत कळत नाही असा अनुभव आहे , तसे अश्या उगाचच