Posts

Showing posts from April 13, 2018

गाडी विकताय ? मग हे लक्षात ठेवाच. :- ऍड. रोहित एरंडे ©

*गाडी विकताय ? मग हे लक्षात ठेवाच...*  ऍड. रोहित एरंडे © आपली स्वतःची गाडी असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. काही लोक नवीन गाडी घेऊन सुरुवात करतात किंवा काही लोक सेकंड हॅन्ड गाडी घेतात. तर काही लोक नवीन गाडी घेताना आपली जुनी गाडी विकतात. ह्या सर्व प्रकारात केवळ गाडीचे पैसे दिले-घेतले म्हणजे प्रश्न संपत नाही, तर गाडीची मालकी कायद्याने तबदील म्हणजेच ट्रान्सफर होणे किती महत्वाचे आहे हे मा. सर्वोच्च न्यायालयाच्या ३ सदस्यीय खंडपीठाने अलीकडेच "नवीन कुमार विरुद्ध विजय कुमार आणि इतर, (अपील क्र . १४२७/२०१८)" या याचिकेवर दिलेल्या निकालावरून स्पष्ट होईल. *ह्या केसची पार्श्वभूमी विशेष लक्षात घेण्यासारखी आहे आणि आपल्यापैकी अनेकांची ह्याच प्रकारची चित्तरकथा असू शकते.* कोणा एका विजय कुमार ह्यांच्या मालकीची मारुती-८०० गाडी ते २००७ मध्ये एका व्यक्तीला विकतात आणि अश्या प्रकारे ३-४ वेळा ती गाडी विकली जाऊन सरते शेवटी ती पिटीशनर - नवीन कुमार हे २००९ साली विकत घेतात. मे-२००९ च्या सुमारास गाडी मागे घेताना अपघात होऊन जाईदेवी आणि नितीन ह्या चुलती-पुतण्यांना अपघात होतो , ज्या मध्ये जाई-देवी ह्या