कॉमन टेरेस विकता येत नाही. ऍड. रोहित एरंडे ©
सर, आमच्या सोसायटीमध्ये 'कॉमन टॉप टेरेसला २ दरवाजे आहेत. एक दरवाजा सामाईक आहे आणि दुसरा दरवाजा एका सभासदाच्या फ्लॅट मधून उघडतो. तो सभासद आता ती टेरेस मला बिल्डर ने विकली आहे, बाकीच्यांचा अधिकार नाही, असे म्हणून त्याच्यावर हक्क सांगायला लागला आहे. कराराची प्रत मात्र दाखवत नाही. ह्या प्रश्नावरून वरचेवर आमच्या सोसायटीमध्ये आता भांडणे व्हायला लागली आहेत. तरी ह्याबाबत काय करता येईल ? एक त्रस्त सभासद, पुणे आपल्या केसमध्ये जर संबंधित सभासद टेरेस (गच्ची) त्याला विकली असे कथित कराराच्या आधारे म्हणत असेल तर त्याबाबत त्याला रीतसर लेखी नोटीस देऊन कराराची प्रत मागवून घ्या किंवा बिल्डरकडून घ्या किंवा रजिस्टर्ड करार असल्यामुळे त्याची प्रत तुम्हालाही काढता येईल. तसेच जरी टेरेसमध्ये जाण्यासाठी स्वतंत्र दार अस्तित्वात असले तरी असे दार खरेच मंजूर नकाशामध्ये दर्शविले आहे का, ह्याचीही तपासणी करा. या निमित्ताने ह्या बाबतीतल्या कायदेशीर तरतुदी थोडक्यात समजावून घेऊ. सर्वप्रथम टेरेस फ्लॅट म्हणजेच फ्लॅटला ...