Posts

Showing posts from September 17, 2022

वारसा हक्क प्रमाणपत्र (Succession certificate) : थोड्क्यात पण महत्त्वाचे. ऍड. रोहित एरंडे. ©

  वारसा हक्क प्रमाणपत्र (Succession certificate) : थोड्क्यात पण महत्त्वाचे. ऍड. रोहित एरंडे. ©  सक्सेशन सर्टिफिकिट आणि हेअरशिप सर्टिफिकिट, ज्यांना मराठी मध्ये वारसा हक्क प्रमाणपत्र असे म्हणतात , हे शब्द आपल्यापैकी अनेकांनी ऐकले असतील आणि अशी प्रमाणपत्रे नसतील तर अनेकवेळा मिळकतींचे व्यवहार देखील अडल्याचे अनुभवले असेल. ह्या लेखात आपण सक्सेशन सर्टिफिकिट बद्दल थोडक्यात महिती घेवू. अश्या प्रमाणपत्रांची गरज कधी पडू शकते ? 'एखाद्या मरण पावलेल्या व्यक्तीचे वारस कोण हे ठरविणे' हा सक्सेशन सर्टिफिकिट आणि हेअरशिप सर्टिफिकिट ह्यांचा उद्देश जरी एकच असला तरी त्यांची गरज वेगवेगळ्या प्रसंगी पडते. म्हणजेच जंगम (मुव्हेबल) मिळकतींबाबत म्हणजेच (सिक्युरिटी /डेट्स) बँक खाती, मुदत ठेवी, शेअर्स , प्रोमिसरी नोट , डिबेंचर्स पीपीएफ खाते, बँक लॉकर अश्या साठी सक्सेशन सर्टिफिकेटची गरज पडते, तर स्थावर (इममुव्हेबल) म्हणजेच घर, जमीन, दुकान ह्या मिळकतींसाठी हेअरशिप सर्टीफिकेट घ्यावे लागते. एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या मिळकतींचे विभाजन हे मयत व्यक्तीच्या मृत्यूपत्राप्रमाणे (टेस्टॅमें