Posts

Showing posts from January 5, 2019

"हल्ले डॉक्टरांवर, परिणाम समाजावर.... " ऍड. रोहित एरंडे.

हल्ले डॉक्टरांवर, परिणाम समाजावर....  ***** ****** ***** ****** **** ऍड.  रोहित एरंडे. एका गोष्टीत दुमत नसावे की इतर  कुठल्याही प्रोफेशन पेक्षा डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप म्हणून ओळखले जाते आणि इथे भक्तांची गल्लत होते. डॉक्टर जर का देव असेल, तर त्याची विटंबना (हल्ला )करू नका....आणि...डॉक्टर जर का देव नसेल तर, त्याच्या मर्यादा ओळखा.  हे लिहिण्याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये डॉक्टर, हॉस्पिटल ह्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.  कलकत्त्यामधील डॉक्टरांवर झालेले जीवघेणे हल्ल्यांचे फोटो बघून अस्वस्थ व्हायला होते. असा एकही दिवस जात नसावा की अश्या घटना घडल्या नाहीत. ह्या पूर्वी स्वाईन फ्लू मुळे  अत्यवस्थ असलेल्या रुग्णाला मृत  घोषीत केल्यामुळे डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप हैदराबाद येथील ग्लोबल हॉस्पिटल मध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी प्रचंड गोंधळ करून तोडफोड करून डॉक्टरांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार मागील आठवड्यात घडला. काही महिन्यांपूर्वी  पुण्यातील एका रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने वैद्यकीय विश्वात खळब