Posts

Showing posts from September 13, 2019

"आई-वडिलांपासून स्वत्रंत्रपणे राहण्यासाठी टुमणे लावणे हा नवऱ्याचा मानसिक छळच " (मग बायकोचा नाही ?) मा. सर्वोच्च न्यायालय.. adv. Rohit Erande

"आई-वडिलांपासून स्वत्रंत्रपणे राहण्यासाठी टुमणे लावणे हा नवऱ्याचा मानसिक छळच " - मा. सर्वोच्च न्यायालय.. (मग बायकोचा नाही ?) Adv. रोहित एरंडे. लग्नानंतर स्वतःचा संसार थाटून वेगळे राहणे हे आता काही नवीन नाही किंबहुना लग्न ठरविताना विवाह मंडळामधील फॉर्म मध्ये तसा रकाना  देखील असतो. समजून उमजून वेगळे राहणे आणि जबरदस्तीने, काहीतरी धमकी देऊन वेगळे राहण्यास भाग पाडणे ह्या मात्र २ वेगळ्या  गोष्टी आहेत. बऱ्याचदा वेगळे राहण्याचा हट्ट हे डिव्होर्स घेण्यामागचे एक कारण सध्या दिसून येते. असेच एक प्रकरण मा. सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले आणि "नवऱ्याला त्याच्या आई-वडिलांपासून वेगळे राहण्यास भाग पाडणे ही  छळवणूक " असा निकाल मा. न्यायाधीशांनी अलीकडेच दिला आहे.  ह्या निकालाची साधक-बाधक चर्चा ह्या लेखाच्या निमित्ताने आपण बघुयात. "लग्नानंतर स्वतंत्र संसार थाटणे हे अजूनही आपल्या संस्कृतीमध्ये बसत नाही. विशेष करून जेव्हा मुलाचे आई-वडील हे पूर्णपणे त्याच्या वरच सर्वार्थाने अवलंबून असतात अश्या केस मध्ये तर बायकोने नवऱ्याला त्याच्या आई-वडिलांपासून स्वत्रंत्रपणे राहण्यासाठी टुम