Posts

Showing posts from January 12, 2024

विवाह नोंदणी आणि कायदा.. थोडक्यात पण महत्वाचे. .. ऍड .रोहित एरंडे .©

विवाह नोंदणी आणि कायदा.. थोडक्यात  पण महत्वाचे.   विवाहानंतर नोंदणी करणे आणि नोंदणी पध्दतीने विवाह करणे या एका वाक्यात आपल्याला फरक लक्षात येईल ऍड .रोहित एरंडे .© लग्न (विवाह) पाहावे करून आणि घर पाहावे बांधून असे आपल्याकडे म्हणतात, कारण यातून आपण अनेक गोष्टी शिकत असतो ज्या शाळा-कॉलेज मध्ये शिकवल्या जात नाहीत ! तर विवाह नोंदणी या महत्वाच्या विषयाची आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करू..  (विधिवत) विवाहानंतर नोंदणी करणे आणि नोंदणी पध्दतीने विवाह करणे या एका वाक्यात आपल्याला फरक लक्षात येईल .  हिंदू विवाह कायदा,१९५५  आणि स्पेशल मॅरेज ऍक्ट  १९५४ असे २ कायदे अनुक्रमे या विषयांशी संबंधित आहेत.  विधिवत विवाह : नोंदणी करणे अनिवार्य  हिंदू विवाह कायद्यांअंतर्गत  विधी करून झालेले विवाह हे बोलीभाषेत  "विवाहानंतर  नोंदणी" ह्या प्रकारात  मोडतात. म्हणजेच धार्मिक /वैदिक पध्दतीने विवाह  झाल्यावर विहित नमुन्यातील फॉर्म भरून नोंदणी अधिकाऱ्यांपुढे विवाहाची  रीतसर  नोंदणी करणे.  पुण्यासारख्या ठिकाणि विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ह्याचे फॉर्म्स उपलब्ध आहेत.विवाहानांतर  किती दिवसात नोंदणी क