Posts

Showing posts from March 29, 2019

वारसा हक्क प्रमाणपत्र (Succession certificate) म्हणजे काय ? - ऍड. रोहित एरंडे ©

 वारसा हक्क प्रमाणपत्र (Succession certificate) म्हणजे काय ? ऍड. रोहित एरंडे. © आपल्यापैकी अनेक लोकांनी  म्हणजेच सक्सेशन सर्टिफिकिट  आणि हेअरशिप सर्टिफिकिट ज्याला मराठी मध्ये     वारसा हक्क प्रमाणपत्र  असे म्हणतात ,  हे शब्द अनेक वेळा ऐकले असतील आणि  अशी प्रमाणपत्र नसतील तर अनेकवेळा मिळकतींचे व्यवहार देखील अडल्याचे अनुभवले असेल. अश्या प्रमाणपत्रांची गरज कधी पडू शकते ? 'एखाद्या मरण पावलेल्या व्यक्तीचे वारस कोण हे ठरविणे' हा  सक्सेशन सर्टिफिकिट  आणि हेअरशिप सर्टिफिकिट  ह्यांचा उद्देश जरी एकच असला तरी त्यांची गरज वेगवेगळ्या प्रसंगी पडते. म्हणजेच जंगम (मुव्हेबल) मिळकतींबाबत म्हणजेच (सिक्युरिटी /डेट्स) बँक खाती, मुदत ठेवी, शेअर्स , प्रोमिसरी नोट , डिबेंचर्स   पीपीएफ खाते, बँक लॉकर अश्या साठी सक्सेशन सर्टिफिकेटची गरज पडते, तर स्थावर (इममुव्हेबल) म्हणजेच घर, जमीन, दुकान ह्या मिळकतींसाठी हेअरशिप सर्टीफिकेट घ्यावे लागते. एखादी  व्यक्ती मयत झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या मिळकतींचे विभाजन हे मयत  व्यक्तीच्या  मृत्यूपत्राप्रमाणे (टेस्टॅमेंटरी) किंवा जर मृत्यूपत्र नसेल तर वार