सोसायटी आणि सभासदांनी केलेले अतिक्रमण - ॲड. रोहित एरंडे ©
आमच्या सोसायटी मध्ये काही सभासदांनी फ्लॅट बाहेरील मोकळ्या जागेत (पॅसेज) मध्ये लोखंडी दार लावून घेतले आहे आणि ती जागा त्यांचीच असल्यासारखे ते वापरतात. २-३ सभासदांनी तर ह्या पॅसेज मधेय कुंड्या ठेवून बागच फुलवली आहे. अश्या प्रकारामध्ये सोसायटीला काही कारवाई करता येईल का ? सोसायटी कमिटी मंडळ , मुंबई उत्तर : आपल्याला जेवढी जागा करारनाम्याने मिळाली आहे तेवढीच जागा वापरण्याचा अधिकार सभासदाला असतो. पॅसेजला ग्रील लावून ती जागा स्वतःचीच असल्यासारखे वागणे, मोकळ्या पॅसेजमध्ये कुंड्या ठेवंणे, असे प्रकार सर्रास बघायला मिळतात आणि कायद्याच्या भाषेत ह्याला अतिक्रमण (एन्क्रोचमेंट) असे म्हणता येईल. या संदर्भात आदर्श उपविधी १६९ (अ) मध्ये स्पष्ट तरतुदी केल्याचे आढळून येईल. ह्या तरतुदीप्रमाणे , "सोसायटी मधील जिना, पायऱ्या तसेच जिन्याखालील जागा, लँडिंग एरिया, टेरेस / मोकळे मैदान / लॉन / क्लब हाऊस / कॉमन हॉल इ. कोणत्याही सभासदाला वैयक्तिक कारणासाठी वापरता येणार नाही. जो सभासद या नियमांचे उल्लंघन करेल, त्यांना दंड आकारण्याची तरतूद या कलमांतर्गत सोसायटीला आहे...