*"धुमसते मणिपूर ...(फारसे माहिती नसलेले ) कायदेशीर आणि जातीय पैलू"*". कोणतीही बाजू घेण्यापूर्वी.. ॲड. रोहित एरंडे. ©
*"धुमसते मणिपूर ..(फारसे माहिती नसलेले ) कायदेशीर आणि जातीय पैलू"*". कोणतीही बाजू घेण्यापूर्वी.. *ॲड. रोहित एरंडे. ©* सर्वत्र व्हायरल झालेला मणिपूर मधील महिला अत्याचाराचा व्हिडिओ बघून कोणीही सुन्न होईल आणि अश्या माणसांना पशू म्हणणे हा पशुंचा अपमान होईल. हा प्रकार ताजा असतानाच राजस्थान मध्ये ही अशीच सामुहिक बलात्काराची घटना घडल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. साधारण मे महिन्याच्या सुरुवातीपासून मणिपूर मध्ये अशांतता पसरली आहे आणि हा व्हिडिओही त्याच सुमारास काढलेला आहे असे म्हणतात , पण तो इतके दिवस बाहेर आला नव्हता, तो अचानक बाहेर आला आणि त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली. मात्र मूळ विषयाला जातीय, कायदेशीर, भौगोलिक असे अनेक कंगोरे आहेत, हे आपल्याला शहरी भागात बसून लक्षात येत नाहीत. कायदेशीर पूर्वपीठिका :. हा वाद आहे मैतई विरुद्ध नागा आणि कुकी ह्या जमातींमधील. मणिपूरमध्ये पूर्वी राज्यसत्ता होती आणि मैतई समाज पूर्वी अनुसूचित जातीमध्ये गणला जायचा. परंतु जेव्हा राज्यसत्ता संपुष्टात येऊन १९४९ साली हा भाग स्वतंत्र भारताम...