Posts

Showing posts from October 7, 2022

मृत्युपत्राच्या प्रोबेटची सक्ती फक्त मुंबई, चेन्नई आणि कोलकता येथेच करता येते. : ऍड . रोहित एरंडे ©

मृत्युपत्राच्या प्रोबेटची सक्ती फक्त मुंबई, चेन्नई आणि कोलकता येथेच करता येते.  ऍड . रोहित एरंडे  © मागील लेखात आपण मृत्यूपत्राबद्दल माहिती घेतली. मृत्यूपत्राची जेव्हा अंमलबजावणीची वेळ येते तेव्हा बँका किंवा काही सरकारी विभाग किंवा सोसायट्या, मृत्यूपत्राच्या प्रोबेट किंवा लेटर्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन  साठी किंवा नोंदणीसाठी अडवणूक करतात असे दिसून आले आहे आणि अश्या अडवणुकीमुळे  पैसे असून देखील त्याचा उपभोग घेता येत नाही, अशी वेळ येते. ह्या लेखाच्या निमित्ताने प्रोबेट म्हणजे काय आणि त्याची सक्ती कुठे करता येते ह्याची माहिती करून घेऊ.  "प्रोबेट म्हणजे काय  " मृत्युपत्रामध्ये व्यस्थाप म्हणजेच Executor नेमला असल्यास प्रोबेट घेता येते.  कोर्टाने प्रोबेट सर्टिफिकेट  देणे म्हणजे संबंधित मृत्यूपत्र हे अस्सल आहे आणि कायदेशीरपणे अंमलात आणलेले आहे अशी पुष्टी देणे. असे सक्षम कोर्टाने दिलेले प्रोबेट हे "भारतामधील सर्वांवर" बंधनकारक असते. प्रोबेट मिळविल्यावर मृत्युपत्राची अंमलबजावणी व्यस्थापकाला करता येते. अर्थात प्रोबेट कोर्ट हे मालकी हक्क ठरवू शकत नाही , म्हणजेच मृत्यूपत्र करणाऱ्याला