कन्व्हेयन्स म्हणजे काय ? ऍड. रोहित एरंडे ©
कन्व्हेयन्स म्हणजे काय ? ऍड. रोहित एरंडे © वकील, डॉक्टर आणि ज्योतिषी ह्यांच्यामध्ये काय साम्य असेल तर ह्यांच्याकडे जाणाऱ्या अशिलांना, अशिलांना आवडेल असा सल्ला हवा असतो आणि असे सल्ले सोशल मिडीयावर उदंड उपलब्ध आहेत. असाच एक "सर्व रजिस्टर्ड सोसायटींसाठी खुश खबर , काल मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयानुसार कन्व्हेयन्स डिड न करता आता आपण जागेचे मालक होणार " अश्या आशयाचा मेसेज बरेच दिवस व्हाट्सऍपवर युनिव्हर्सिटीवर फिरत आहे आणि ह्या मेसेज प्रमाणे खरेच होणार का अशी विचारणा आमच्याकडेही बरेचदा केली जाते. एकतर कुठलाही कायदा बदलण्याची विहित प्रक्रिया असते आणि मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कायदे केले जात नाहीत त्यामुळे सदरचा मेसेज एक अफवा आहे. या अनुषंगाने कन्व्हेयन्स बद्दलच्या तरतुदींची थोडक्यात माहिती घेऊ. कन्व्हेयन्स म्हणजे काय ? सोसायटी आणि आपार्टमेंट ह्या दोन्हींच्या बाबतीत कन्व्हेयन्सची संकल्पना वेगळी आहे. कन्व्हेयन्सचा अर्थ एखाद्या जागेमधील मालकी हक्क दुसऱ्याच्या नावे...