सण - समारंभ आणि कायद्याची चौकट
सण - समारंभ आणि कायद्याची चौकट *Adv. रोहित एरंडे * जाणते वा अजाणतेपणे, कायदा मोडला गेल्यास "कायद्याचे अज्ञान" हा कधीही बचाव होऊ शकत नाही. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे गणेशोत्सव, दहीहंडी काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठका, ढोल-ताशांचा सराव देखील सुरु झाले आहेत . परंतु हे सर्व करताना उत्साहाच्या भरात आपल्या हातून कायद्याचा भंग तर होत नाहीना ह्याचे भान राखणे गरजेचे आहे. कारण गेल्या काही वर्षांमध्ये सर्व धर्मीय सण -समारंभांमुळे होणाऱ्या त्रासांविरुद्ध अनेक जनहित याचिका दाखल होत आहेत आणि त्यावर मुंबई उच्च न्यायालायने, सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निकालांचा आधार घेऊन, दिलेले निकाल खूपच स्पष्ट आहेत. परत ह्या निकालांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालये प्रचंड आग्रही देखील आहेत. मागील वर्षी दही हंडी हा साहसी खेळ आहे की नाही आणि दही हंडीसाठीकिती थर लावावे ह्या बाबतीत प्रकरणे पार सर्वोच्च न्यायालयात पोह...