चित्रपटातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यास सर्वोच्च संरक्षण .. पण ...
अभिव्यक्ती स्वातंत्र्यास सर्वोच्च संरक्षण .. "पद्मावती", "दशक्रिया", "न्यूड", "सेक्सी दुर्गा" या चित्रपटांवरून सध्या सर्व प्रकारच्या मीडियावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुद्ध धार्मिक, सामाजिक भावना ह्यावर रणकंदन माजलेले आहे. ह्याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालायने काही दिवसांपूर्वी दिलेला निकाल हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करणारा आणि महत्वपूर्ण आहे. नचिकेत वाल्हेकर नामक याचिकाकर्त्याने अरविंद केजीरवाल यांच्या जीवनावर देशभर प्रदर्शित होत असणाऱ्या "an इनसिग्निफिकन्ट मॅन " ह्या चित्रपटावर बंदी घालावी ह्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयातच याचिका दाखल केली. याचिकाकर्त्याने पूर्वी केजरीवाल, प्रशांत भूषण आणि मनीष सिसोदिया यांच्यावर मा. अण्णा हजारेंची तसेच जनतेची दिशाभूल केली म्हणून शाई फेकायचा प्रयत्न केला होता अशी बातमी व्हायरल झाली होती. याचिकाकर्त्यांचे कथन होते कि ह्या चित्रपटात त्याच्या संदर्भात जी एक व्हिडीओ क्लिप दाखवली आहे, ती पूर्वी मीडिया मध्ये दाखवली गेली होती, मात्र त्या विरुद्ध दिल्ली येथील पतियाळा कोर्ट...