सोसायटीमध्ये देखभाल खर्च सर्वांना समानच असतो आणि सोसायटीचे उपविधी, ठराव, कमिटी हे कायद्यापेक्षा मोठे नसतात. ऍड. रोहित एरंडे ©
नमस्कार, आमच्या सोसायटीमध्ये १, २,३ बी.एच.के. असे वेगवेगळे फ्लॅट्स आहेत. आमचा फ्लॅट ३ बी.एच.के आहे आणि आमच्याकडून फ्लॅटच्या एरिया प्रमाणे मेंटेनन्स घेतला जातो. ज्याचा फ्लॅट मोठा त्याने जास्त खर्च सोसायचा, असे आम्हाला सांगितले जाते आणि काही विचारले कि सोसायटीने ठराव केला आहे असे उत्तर दिले जाते. तरी ह्या बाबतीत कायदा काय आहे हे कृपया सांगावे ? एक वाचक, पुणे. सोसायटीमध्ये देखभाल खर्च सर्वांना समानच असतो. आपला प्रश्न बघून असे म्हणावेसे वाटते कि एकतर लोकांना कायद्याची माहिती नाही किंवा माहिती असून तो न पाळण्याचा बिनधास्तपणा आला आहे. ह्या विषयावरचा कायदा खरेतर आता पक्का झाला आहे, तरीही अजूनही असे प्रकार घडत असतील तर दुर्दैवी आहे. देखभाल खर्च (मेंटेनन्स) किती आकारावा हे ठरविण्याचा अधिकार सोसायटीला नक्कीच आहे. मात्र तो देखभाल खर्च सर्वांना सामान असावा हे कायदा सांगतो. निवासी असो वा व्यावसायिक, पहिल्या मजल्यावर राहताय का शेवटच्या मजल्यावर, फ्लॅट छोटा आहे का मोठा , त्यानुसार मेंटेनन्स ठरत नाही. तसेच, मी पहिली मज...