कोरोना, सोशल मिडिया आणि ' सर्वोच्च ' आदेश . ऍड. रोहित एरंडे. ©
कोरोना, सोशल मिडिया आणि ' सर्वोच्च ' आदेश ऍड. रोहित एरंडे. © सोशल मिडीयाच्या वेगाने आता वाऱ्याच्या वेगालाही मागे टाकले आहे. बरेचवेळा ह्या माध्यमातून पाठवल्या जाणाऱ्या बातम्यांबाबतीत खरे-खोटे काय ह्याची खात्री न करताच मेसेजेस फॉरवर्ड केले जातात आणि ह्याचे प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष परिणाम समाजाला भोगायला लागतात. कोरोना बाबतीत ह्याचा प्रत्यय विशेषत्वाने आला. मास्क घालायचा की नाही, वर्तमान पत्र घ्यायचे कि नाही, कोरोनावर रामबाण उपाय कोणते, कुठल्या समाजाने काय केले, असे अनेक पोस्ट्स 'मी पहिला' म्हणून हिरीरीने पाठवले जातात. ह्यात नुकतीच भर पडली ती अश्याच काही मेसेजेसची ,१- आपले सर्वांचे फोन आता टॅप होणार २) सर्वोच्च न्यायालयाने व्हाट्सऍप मेसेजेस वर बंदी घातली आहे. आणि ३) व्हाट्सऍप ऍडमिन ला आक्षेपार्ह मजकूरसाठी अटक होणार. प जो तो आपापल्या बुद्धीप्रमाणे ह्यांचा अर्थ लावून चर्चा करत बसतो. तसेच एक निरीक्षण असे आहे कि ज्येष्ठ नागरिक, जे नुकतेच स्मार्ट फोन वापरयाला लागलेत, त्यांचा तर अश्या बातम्यांवर चटकन विश्वास बसतो. टेलिफोन ...