दोन फ्लॅट एकत्र केले तर मेंटेनन्स किती ? - ॲड. रोहित एरंडे ©
प्रश्न : आमच्या सोसायटीत फ्लॅट बरोबर काही दुकाने देखील आहेत. ह्यातील दुकानदारांकडून ते व्यवसाय करतात म्हणून वाढीव दराने मेंटेनन्स घ्यावा आणि त्यासाठी बायलॉजमध्ये बदल करू असे काही फ्लॅट धारक म्हणत आहेत. तर अशी मागणी योग्य आहे का ? आणि असे बायलॉज बदलता येतील का ? तसेच आमच्याकडे काही सभासदांनी २ फ्लॅट एकत्र केले आहेत आणि अश्या वेळी मेंटेनन्स एक घ्यावा का डबल , असे वाद होतात, तरी ह्याबाबत मार्गदर्शन करावे. काही त्रस्त सभासद , पुणे-०९. उत्तर : आपल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मा. मुंबई उच्च न्यायालयाने सुनंदा रांगणेकर विरुद्ध राहुल अपार्टमेंट सोसायटी (२००६) १ Mh .L .J ७३४ ह्या निकालात दिले आहे. मा. मुंबई उच्च न्यायालायने 'निवासी आणि व्यावसायिक सदनिकांमध्ये भेद करता येणार नाही' असे नमूद करून दुकानदारांकडून जादा दराने घेत असणारा देखभाल खर्च रद्द ठरविला. त्यामुळे तुमच्या सोसायटीमध्ये देखभा खर्च सर्वांना समानच आकारला गेला पाहिजे आणि ह्या कायदेशीर तरतुदींविरुद्धचे कोणतेही ठराव बेकायदेशीर ठरतील. त्याचप्रमाणे जादा मेंटेनन्स, जादा ट्रान्सफर फी किंवा ना वापर ...