सोसायटी मध्ये ट्रान्स्फर फी, मेंटेनन्स आणि ना-वापर शुल्क किती आकारता येते ? -ऍड. रोहित एरंडे.
सोसायटी आणि ट्रान्स्फर फी, मेंटेनन्स आणि ना-वापर शुल्क .. - नेहमीचे त्रिवाद सोसायटी आणि सभासद ह्यांच्यामधील वाद हे बहुतांशी वेळा हे आर्थिक कारणांशीच निगडित असतात आणि यामध्ये पहिल्या तीनामध्ये स्थान असते ट्रान्स्फर फी, मेंटेनन्स आणि ना-वापर शुल्क ह्या संबंधातील वाद , हे आपल्यापैकी अनेकांना मान्य होईल. सभासदत्व हस्तांतरण फी म्हणजेच ट्रान्सफर फी हि जास्तीत जास्त रु. २५,०००/- इतकीच घेता येते असे असून देखील काही लाख रुपये आकारले म्हणून आणि इतर कारणांसाठी नुकतेच मुंबईमधील एका उच्चभ्रू सोसायटीवर प्रशासक नेमल्याची आणि सोसायटीची बँक खाती सील केल्याची बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली. खरे तर ह्याबाबतीतला कायदा आता "सेटल" झाला असे असून देखील अजूनही असे प्रकार होतात ह्याचे सखेद आश्चर्य सदरची बातमी वाचून वाटले. ह्या संबंधीच्या कायद्याची थोडक्यात माहिती घायचा आपण प्रयत्न करू. ट्रान्सफर फी किती असावी ? सोसायटीमधील प्लॉट/फ्लॅट/दुकान विकताना सभासदत्व ट्रान्सफर फी पोटी भरमसाट रकमा आकारल्या जाण्यावरून अनेक तक...