पार्किंग समस्या : बिल्डरपासून सोसायटी पर्यंत:. ॲड. रोहित एरंडे ©
कृपया सोसायटीमधील पार्किंग संबंधीत कायदा काय आहे ? पार्किंग जागेवर भाडेकरू गाडी लावू शकतो का ? नितीन महाजन, आपण एका महत्वाच्या विषयावरील प्रश्न विचारला आहे. "आमच्या सोसायटी मध्ये आम्ही 'अतिथी देवो भव' ही संस्कृती जपतो. परंतु आमचेकडे पार्किंग समस्या असल्याने, देवांनी त्यांची पुष्पक विमाने सोसायटी बाहेर लावावीत" असा विनोद व्हॉट्सॲप वर मध्यंतरी वाचला आणि विनोदाचा भाग सोडला तरी वाहने जास्त आणि जागा कमी ह्यामुळे पार्किंग समस्या हा सोसायटीमध्ये कायमच वादाचा विषय होतो. पार्किंगचे २ प्रकार साधारणपणे कायद्याने ओळखले जातात. १. सामाईक (कॉमन /ओपन)पार्किंग आणि स्टील्ट पार्किंग आणि २. कव्हर्ड / गॅरेज पार्किंगसरकारने संमत केलेली विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे फ्लॅट्सच्या संख्येनुसार सायकल, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी किती पार्किंग उपलब्ध करून द्यावे, यासंबंधीचे गणित दिलेले आहे, त्या प्रमाणेच इमारतीचा बांधकाम नकाशा संमत केला जातो. कॉमन /ओपन पार्किंग आणि स्टील्ट पार्किंग बिल्डरला विकता येत नाही : मा. सर्वोच्च न्या...