ताबा कोणाचा ? ऍड. रोहित एरंडे
ताबा कोणाचा ? ऍड. रोहित एरंडे. रुक्ष वाटणाऱ्या, किचकट कायद्यांचा अभ्यास कराव्या लागणाऱ्या वकीली व्यवसायात कधी कधी हसवणुकीचे प्रसंग येतात. कोर्टातील विविध दाव्यांमध्ये घरमालक -भाडेकरू ह्यांच्यामधील दावे हिरीरीने भांडली जातात आणि कधी कधी कारणे देखील खूप मजेशीर असतात. काही वर्षांपूर्वी पुणेरी बाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पेठेमधील एका जुन्या वाड्यातील जागेची केस आम्ही घरमालकातर्फे लढवत होतो . ह्या केस मध्येएक मजेशीर प्रश्न उद्भवला की वाड्यामधील सामाईक संडास कोणाच्या ताब्यामध्ये आहे. घरमालक -भाडेकरू दोघेही जण दुसऱ्या ठिकाणी राहत होते, परंतु ताबा मात्र स्वतःचा सांगत होते . शेवटी कोर्टाने "कोर्ट-कमिशनर" नेमून संडासचा ताबा कोणाकडे आहे हा अहवाल मागितला. १५ दिवसांनी "कोर्ट-कमिशनर" ने ठरविलेल्या वेळी मी, तसेच भाडेकरू आणि त्यांचे वकील जागेवर जाऊन पोहोचलो. संडासाला तर बाहेरून कुलूप लावलेले होते. मात्र अर्धा तास झाला ...