समान नागरी कायदा : तरतूद घटनेमध्येच मात्र अंमलबजावणी अद्याप नाही. ऍड. रोहित एरंडे©
समान नागरी कायदा : तरतूद घटनेमध्येच मात्र अंमलबजावणी अद्याप नाही. ऍड. रोहित एरंडे© सध्या वाऱ्याच्या वेगा पेक्षा एखादी बातमी सोशल मिडीयाच्या वेगाने पसरते असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. गेले १-२ दिवस "समान नागरी कायद्याबद्दल" अश्याच बातम्या व्हायरल होत आहेत. ह्याला निमित्त ठरले मा. दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्त केले मत. " बदलत्या भारतामध्ये लोक जाती, धर्माच्या पलिकडे जात आहेत. त्यामुळे घटस्फोटासारख्या काही प्रकरणात तरुण जोडप्यांना अडचणी येऊ शकतात. त्यातून मार्ग काढण्यासाठी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची गरज आहे," असे मत मा. दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश प्रतिभा एम. सिंह यांनी व्यक्त केले. ह्या केसची थोडक्यात हकीकत बघू. मा. न्या. सिंह यांच्यासमोर जून 2012 मध्ये हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केलेल्या मीणा जातीच्या जोडप्याचा घटस्फोट हिंदू विवाह कायदा-1955 अंतर्गत होणार की नाही?, असा प्रश्न उपस्थित झाला. नवऱ्याच्या घटस्पोटाच्या अर्जाला महिलेने विरोध करताना " मी रा...