म्हाडा बिल्डिंगचा पुनर्विकास : ऍड. रोहित एरंडे
म्हाडा बिल्डिंगचा पुनर्विकास लोअर परळ, सेनापती बापट मार्गावर फिनिक्स मॉलच्या जवळ आमच्या तपोवन 'अ', 'ब' आणि 'क' या म्हाडाच्या इमारती आहेत. तर बाजूलाच भगिरथ ही देखील म्हाडाची इमारत आहे. या इमारतीतील सध्याच्या खोल्यांचा आकार १८० चौ. फूट आहे. आमच्या परिसरात गेल्या सात-आठ वर्षांपासून पुनर्विकासाचे वारे वाहत आहेत. साहजिकच एक नामांकित बांधकाम व्यावसायिकाने आणि काही संधिसाधू लोकप्रतिनिधींनी आमच्या इमारतींच्या जागेवर डोळा ठेवून ही संधी कॅश करण्यासाठी तयारी चालवली आहे. या अंतर्गत या विकासकाने भगिरथला एक प्रस्ताव दिला आहे. यात ५८५ चौ. फूट कार्पेट एरिया आणि १८ हजार रुपये दरमहा घरभाडे तसेच कॉर्पस फंडही देण्याचे कबुल केले आहे. मात्र यात नेमका आकडा सांगितलेला नाही. अशी घसघशीत ऑफर मिळाल्याने बहुतांश रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा विकासक याच रांगेतील खिमजी नागजी चाळ (साधारण नऊ चाळी) , बारा चाळ, तपोवन आणि भगिरथ या इमारतींचा एकत्रित विकास करणार आहे. मात्र, आमच्या इमारती या म्हाडाच्या अखत्यारित असून, त्यांच्या जमिनीची मालकीही म्हाडाकडे आहे. माझ्या माहितीनुसार म्हाडाच्या म...