Posts

Showing posts from January 11, 2023

सभासदत्व आणि मालकी हक्क यांत फरक - ॲड. रोहित एरंडे ©

 सोसायटी (प्रसिद्धी १२ जानेवारी २०२३) .. प्रश्न १२जाने.१ आमची १२ सभासदांची रहिवासी गृहनिर्माण सह. संस्था आहे. या इमारतीमधील तीन सभासदांचे निधन झाले आहे. त्यापैकी एका सभासदाने मृत्यूपूर्वी त्यांच्या पत्नीचे नावे नॉमिनेशन करून दिलेले आहे. तर इतर दोघांचे नाही.   या दोन्ही प्रकारच्या घरांच्या वारसदारची नोंद घेण्याबाबत काय कार्यवाही करावी, याचे कृपया मार्गदर्शन व्हावे. ही विनंती. आपला विश्वासू, किशोर बाजीराव थोरात  सोसायटीमध्ये बरेचदा मूळ सभासद मयत झाल्यानंतर त्याच्या वारसांमध्ये आणि नॉमिनी मध्ये वाद निर्माण होतात आणि अश्यावेळी सोसायटी कमिटीपुढे ह्या वादाचे निरसन कसे करायचे असा प्रश्न निर्माण होतो. ह्या पार्श्वभूमीवर मा. मुंबई उच्च न्यायालयाने 'करण खंडेलवाल विरुध्द वैकुंठ (अंधेरी) को. ऑप. सोसायटी (रिट याचिका क्र. १२४६८/२०२२), या याचिकेवर नुकताच  एक महत्वपूर्ण निकाल देऊन ह्या बाबतीतील कायदा परत एकदा स्पष्ट केला आहे आणि ह्याचा फायदा सोसायटी आणि सभासद दोघांना होणार आहे. या निकालासाठी मुंबई उच्च न्यायालायने परत एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या   २०१६ सालातील  'इंद्राणी वही विरुद्ध सोसा. रजिस