जागामालकांसाठी : भाडेकराराची नोंदणी करा, तुरुंगवास टाळा..- ऍड. रोहित एरंडे . ©
जागामालकांसाठी : भाडेकराराची नोंदणी करा, तुरुंगवास टाळा : ऍड. रोहित एरंडे . © जागा भाड्याने किंवा लिव्ह-लायसेन्स देणे हा जागा मालकांसाठी उत्पन्न मिळवून देण्याचा चांगला पर्याय आहे आणि सध्या जागांच्या वाढलेल्या किंमती बघता जागा भाड्याने घेऊनच राहण्याकडे किंवा व्यवसाय करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. अर्थात हे सगळे कायदेशीर कोंदणात बसले असेल तरच अर्थ आहे. हे सांगण्याचे कारण असे की अजूनही भाडे-करार करताना लोकांचा कल त्याची नोंदणी न करण्याकडे दिसून येतो आणि अश्या कराराची नोंदणी करण्याचे गांभीर्य कोणी लक्षात घेत नाही. ह्या मागे मानवी स्वभावाचा एक गंमतीशीर पैलू दिसून येतो, तो म्हणजे पैसे वाचविणे आणि त्याचे कौतुक इतरांना सांगणे. वाचायला थोडेसे कठोर वाटेल, परंतु वस्तुस्तिथी अशी आहे. केवळ नोटरी करार केला म्हणजे झाले, असे लोकच स्वतः ठरवितात. मात्र अश्या क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास ती चूक घरमालकाला थेट तुरुंगवास घडवू शकते. भाडे करार /लिव्ह-लायसेन्स लेखी असणे आणि त्याची दुय्यम उपनिबंधकांकडे नोंदणी करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही घरमालकावर असत...