सोसायटी आणि पार्किंगचा यक्ष प्रश्न.. - ॲड. रोहित एरंडे ©
सर, आमच्या सोसायटीमध्ये पार्किंग वरून कमिटी आणि सभासद यांच्यामध्ये वाद वाढत आहेत. काही सभासदांकडे २ पेक्षा अधिक गाड्या आहेत त्यांना कायम जादाचे पार्किंग हवे असते, तर काही सभासदांचे भाडेकरू राहतात त्यांना पार्किंग वापरता येते का ? एकंदरीतच पार्किंगबाबत काही विशेष नियमावली आहे का ?. सोसायटी कमिटी, पुणे. आपल्यासारखे प्रश्न अनेक सोसायटीमध्ये दिसून येतात. सोसायटी बायलॉज (उपविधी) क्र. ७८-८४ पार्किंग प्रमाणे पार्किंग बद्दलचे नियम, पार्किंग शुल्क इत्यादी ठरविण्याचे अधिकार जनरल बॉडीला आहेत, त्याची थोडक्यात माहिती आपण घेऊ. उपविधी ७८ - वाहने उभी करण्यासाठी जनरल बॉडीमध्ये नियम करता येतील आणि ते नियम सर्वांवर बंधनकारक असतील. त्यामुळे जनरल बॉडी मध्ये आपापल्या परिस्थितीचा विचार करून त्यावर निर्णय घ्यावा. पार्किंगची जागा अलॉट करताना "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य" ह्या तत्वाचा अंगीकार केला जाईल. मात्र मिळालेले पार्किंग विकण्याचा किंवा भाड्याने देण्याचा अधिकार सभासदाला असणार नाही. त्याचप्रमाणे ज्या पार्किंग जागा सभासदाला कायदेशीरपणे अलॉ...